OER व CC
CC license : सामायीकरणाचे प्रमाणपत्र. एखादा OER कसा शेअर केला आहे हे इतरांना कळावे म्हणून यात अनेक प्रकारची licences घेऊन आपल्या OER ला लावता येतात. हे सर्व प्रकार मुख्य ५ प्रकारांचे एकत्रीकरण (कॉम्बिनेशन ) करून बनतात .
या licence चे हे प्रकार, त्यांची कॉम्बिनेशन्स व ते कसे मिळवायचे हे खूप सोपे आहे. हे बघण्यासाठी http://creativecommons.org/ या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
थोडक्यात ते असे आहेत -
१. पब्लिक डोमेन : कोणतेही licence नाही.
२. CC BY - हा OER आपल्याला आपल्या resource मध्ये वापरता येईल पण ज्याच्याकडे त्याचे licence आहे त्याचे (BY) नाव आपल्याला आपल्या resource मध्ये नमूद करावे लागेल.
३. CC ND - (Non-Derivative) - हा OER त्यात कोणताही बदल न करत वापरू शकतो.
२. CC BY - हा OER आपल्याला आपल्या resource मध्ये वापरता येईल पण ज्याच्याकडे त्याचे licence आहे त्याचे (BY) नाव आपल्याला आपल्या resource मध्ये नमूद करावे लागेल.
३. CC ND - (Non-Derivative) - हा OER त्यात कोणताही बदल न करत वापरू शकतो.
४. CC NC - (Non-Commercial) - हा OER व्यावसायिक उपयोगाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी वापरू शकतो.
५. CC SA - (Share Alike) - हा OER त्याच्या licence मध्ये कोणताही बदल ना करता वापरू शकतो.
वरीलपैकी २ ते ५ ची कॉम्बिनेशन्स करून वापरू शकतो.
उदा.
१. मी एका कंप्युटर प्रोग्रॅमचा फ्लोचार्ट Draw.io वर बनवला होता त्याला CC चे licence (CC BY NC SA) लावले. म्हणजे हा फ्लोचार्ट कोणीही वापरू शकतो पण त्याला त्यात माझे नाव नमूद ठेवावे लागेल (BY), त्या फ्लोचार्ट मध्ये तो बदलही करू शकतो (ND वापरलेले नाही ), अव्यावसायिक उपयोगासाठीच वापरू शकतो (NC) आणि जेव्हा तो अशा प्रकारे बनवलेला त्याचा OER शेअर करील तेव्हा त्याच्या मूळ OER च्या licence मध्ये कोणताही बदल न करता (म्हणजे CC BY NC SA असे ) शेअर करावे लागेल (SA).
२. ही पोस्ट व हा ब्लॉगही CC BY SA आहे .
संपादन : विशाल वि. पारकर
vishalparkar@gmail.com
संदर्भ:
१. http://creativecommons.org/
२. http://rcmoocs.in/
OER व CC by Mr. Vishal Vijaykumar Parkar is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License